युथ इन्स्पेरिशन कॅप कराटे स्पर्धेत बारामती कराटे क्लबला 84 पदके

बारामती :- 5 सप्टेंबर 2021 रोजी वीरशैव मंगल कार्यालय, बारामती येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय युथ इन्स्पेरिशन कॅप कराटे स्पर्धाचें आयोजन वर्ल्ड ऑथोरिटी शोतोकान कराटे दो असोसिएशन इंडिया या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, पिपरी-चिंचवड, श्रीरामपूर, सोलापूर, सातारा, वाघोली व बारामती असे 7 जिल्हातील सुमारे 147 स्पर्धकांनी सहभाग घेतला. काता व कुमिते प्रकारामध्ये बारामती कराटे क्लब या संघाने 39 गोल्ड , 25 सिल्वर, 22 ब्रान्झ असें एकूण 86 पदकासह या स्पर्धेत उत्कृष्ट संघ म्हणून बारामती कराटे क्लब (BKC) चा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत बारामती कराटे क्लबचें प्रमुख प्रशिक्षक मिननाथ भोकरे व प्रशिक्षिका सौ.शिवानी काटे यांच्या नेतृत्वाखाली 52 खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत स्पेशल मुलाचं वयोगट (बोलायला व आयकण्यास येत नसल्या साठीचा वयोगट) त्या मध्ये बारामतीचा विद्यार्थी कु. सर्वेश गणेश दळवी यानें 1 गोल्ड व 1 सिल्वर मेडल बेस्ट प्लेअर म्हणून प्राविण्य मिळाविले.
यशस्वी संघाचें नावे व त्याचें पदके पुढील प्रमाणे – संघर्ष स्पोर्ट्स क्लब श्रीरामपूर या संघास 7 गोल्ड, 5 सिल्व्हर, 26 ब्रॉंझ असें एकूण 41 मेडल मिळावीत प्रथम क्रमांकांचा संघ म्हणून बहुमान मिळविला.

स्मिता पाटील एज्युकेशन सोशल स्पोर्ट्स फॉउंडेशन पुणे या संघास 10 गोल्ड, 11 सिल्व्हर, 12 ब्रॉंझ असें एकूण 33 मेडल मिळावीत दुसऱ्या क्रमांकांचा संघ म्हणून बहुमान मिळविला.

शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर या संघास 5 गोल्ड, 13 सिल्व्हर, 14 ब्रॉंझ असें एकूण 31 मेडल मिळावीत तिसरा क्रमांकांचा संघ म्हणून बहुमान मिळविला.

AIM शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया पुणे या संघास 8 गोल्ड, 9 सिल्व्हर, 9 ब्रॉंझ असें एकूण 26 मेडल मिळावीत चौथा क्रमांकांचा संघ म्हणून बहुमान मिळविला.

शोतोकान ग्लोबल जपान कराटे अकादमी,वाघोली पुणे या संघास 6 गोल्ड , 3 सिल्व्हर , 3 ब्रॉंझ असें एकूण 13 मेडल मिळावीत पाचवा क्रमांकांचा संघा म्हणून बहुमान मिळविला.

या स्पर्धा 4 वर्षी ते 18 वर्षी वयोगटातील मुले मुली याच्यात काता व कुमिते प्रकारात वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या नेमावलीने व सर्व करोना नियमावलीचें पालन करित नवीन विद्यार्थ्यांनाचं उत्साह वाढावा म्हणून या स्पर्धा बारामती शहरात आयोजन केले अशी माहिती वर्ल्ड ऑथोरिटी शोतोकान कराटे दो असोसिएशन इंडियाचें अध्यक्ष श्री मिननाथ रमेश भोकरे यांनी दिली, तसेच या स्पर्धेत पंच म्हणून सेन्सेई कैलाश लोहार, सेन्सेई संजय शिंदे, सेन्सेई हार्जित सिंग परब, जॉसेफ मेंडीस, सागर नवल, अमोल देडे, सौ लोहार मॅडम, सौ शिवानी काटे, सौ सुषमा पिसाळ, आदित्य माळी, चेतना गुडेकर, प्राजक्ता धोत्रे, अनिकेत जवळेकर, धर्म पिसाळ, नवनाथ खेडकर, मंथन भोकरे, विशाल वाघमारे,अशोक शिंदे, कोमल कांबळे, सुशांत पोळ यांनी रेफरीची कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *