आमराई भागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

नगरसेविका मयुरी शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी :- प्रभाग क्र.१७ आमराई भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ५ लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी वॉटर सॉफटनर प्लॅन्ट बसविणे, आमराई मोठी विहीर पडझड झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करणे, पोस्ट ऑफिस कार्यालया समोरून जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ (स्टॅम्प काँक्रीट) करणे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (स्मारक) या ठिकाणी हजारो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्या ठिकाणी वॉटर कुलर (थंड पाणी फिल्टर) बसविणे या कामाचा शुभारंभ करण्यात आला. विशेषता आमराई भागातील लोकांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आमराई विहीर या ठिकाणी ५ लक्ष लिटरची पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्यामुळे आमराईकरांना मुबलक पाणी मिळेल.
या कामांचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ.पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर ,गटनेते सचिन सातव ,उपगटनेत्या सविताताई जाधव, बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, नगरसेवक बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, अभिजित चव्हाण, कुणाल गालिंदे, दिनेश जगताप, दिपक गायकवाड , सुरज शिंदे तसेच नगरसेविका अश्विनी गालिंदे ,निता चव्हाण, अनिता जगताप, माजी नगरसेविका हिराबाई धोत्रे, कल्पना शेलार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी भानुदास बागाव, गजानन गायकवाड, सतीश खुडे, श्रीकांत पाथरकर, सागर लोंढे,अजय नागे, शब्बीर शेख, अँड.उमेश शिंदे, कंत्राटदार योगेश हिंगणे,उत्तम धोत्रे, संग्राम काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
ही कामे मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेविका सौ. मयुरी सुरज शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *