टेक्निकल विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा

बारामती : येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पर्यावरण संवर्धन साठी विविध रोपांची लागवड करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.प्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख सर यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत अश्याच पद्धतीने काम करणार असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी विद्यालयाचे प्रा.श्री झाकीर शेख,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर,रयत बँकेचे संचालक श्री अर्जुन मलगुंडे ,जेष्ठ शिक्षक श्री संजय गुळवे सर,श्री प्रदीप पळसे सर,श्री जयवंतराव मांडके सर,श्री सोमनाथ मिंड सर उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )