गावस्तरावर योजना पोहचण्यासाठी कॅम्प राबविने गरजेचे – सौ. परदेशी

गावस्तरावर योजना पोहचण्यासाठी कॅम्प राबविने गरजेचे – सौ. परदेशी

इंदापूर, प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यातील तहसीलदार श्रीकांत पाटील व नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य, या सरपंच संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष व कुंभारगावच्या विद्यमान सरपंच सौ .उज्वलाताई दत्तात्रेय परदेशी यांनी ग्राम विकास कामे या विषयावर मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, रस्ता कॉंक्रिटीकरण, घरकुल योजना, भूमिगत गटार, जल व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता या मूलभूत गरजा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये पूर्ण करणे गरजेचेच असून, त्याचबरोबरच शिधा पत्रिकेमध्ये नाव कमी करणे, नवीन शिधापत्रिका काढणे, जातीचा दाखला काढणे, अपंगत्वाचा दाखला , ड्रायव्हिंग लायसन काढणे, श्रावण बाळ निराधार योजना व इतर दाखले मिळण्याकरता सर्वसामान्याचे नेहमीच फरफट होत असते. त्याकरता शासन आपल्या दारी योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवून, कॅम्प घेऊन सर्वसामान्यांना कॅम्प च्या माध्यमातून दाखले देता येतात असा उपक्रम सर्व ग्रामंचायत मध्ये राबिण्याबाबत विचार केला पाहिजे. त्यामुळे हा सुद्धा एक विकासाचाच भाग होऊ शकतो, तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (back water) मध्ये इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावातील अनेक लोकांच्या जमिनी घरे पाण्याखाली गेल्या आहेत, त्याचे पुनर्वसन झाले नसून त्यांना राहण्यासाठी घर अजून मिळाली नाहीत. तसेच कुंभारगाव येथील गावाचा सिटी सर्वे न झाल्यामुळे प्रत्यक्ष उतारा नसल्यामुळे कोणतेही विकासात्मक योजना राबवताना अडथळा येत असून तसेच घरकुल सुद्धा मंजूर करण्यास अडचणी येत आहेत, असे मत व्यक्त केले, तसेच राहुल भोई यांनी सर्व लाभार्थींना शिधापत्रिका मिळवून देण्याकरता तहसीलदार यांना निवेदन देऊन सहकार्य करण्याची विनंती केली, यावेळी कुंभार गावचे ग्रामसेवक सतीश बोरावके, भिगवन ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी श्री दत्तात्रेय परदेशी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, तलाठी, पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )