प्रतिनिधी – मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख यांनी रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या नुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बारामती तालुका पोलिस स्टेशन हद्दीत अभिलेखा वरील फरार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार यामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन गु.र.न. 975/2021. भा.द.वि. कलम. 392, 323, 504, 506, 34 मधील आरोपी नामे सौरभ सुनील लोणकर वय 20 रा. माळेगाव ता. बारामती हा माळेगाव बुद्रुक रोडवर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सापळा लावून तो सदर ठिकाणी आला असताना त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सौरभ सुनील लोणकर वय 20 रा. माळेगाव ता. बारामती जि पुणे असे सांगितले त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास सदर गुह्याच्या कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई. मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते मा. उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि संदिप येळे, पो.हवा रविराज कोकरे, पो ना अभिजीत एकशिंगे, पो ना स्वप्निल अहिवळे, चा सहा फौ काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.