… अखेर प्रभाग १ मधील ७० वर्षांचा प्रश्न निकाली : नगरसेवक समिर चव्हाण यांचे मानले स्थानिकांनी आभार.

नानासाहेब साळवे – बारामतीमध्ये चारही बाजुला आपण विकास कामे चालु असताना पाहत आहोत यामध्ये आज आणखी एका विकास कामाची भर पडली. तांदुळवाडी ते विमानतळ या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी बरेच दिवसांपासुन होत होती आणि या रसत्याने वाहतुक देखील वाढली आहे. बरेच दिवसांपासुन प्रलंबीत असलेला रोडचे डांबरीकरण होणार असल्यामुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 1 तांदूळवाडी मध्ये भोसले वस्ती ते विमानतळ रोड च्या रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक समीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी गावातील अशोक अंबुरे , बाळासो बाबर , अमित मालुसरे ,हनुमंत बाबर सुनिल जाधव , आप्पासो भोसले , प्रमोद नानेकर , मनोज सावंत , जितेंद्र पिसाळ शुभम भोसले , आदित्य भोसले , प्रकाश सावंत , संजय कांबळे, कोळपे ,भापकर , दत्तात्रय बाबर , पत्रकार नानासाहेब साळवे, संतोष कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गेली 70 वर्षाचा प्रश्न मिटल्यामुळे वस्ती वरील लोकांनी बुके देऊन नगरसेवक समीर चव्हाण यांचे आभार मानले व आम्ही कायम आपल्या सोबत राहू असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *