प्रतिनिधी- उपविभाग बारामती व तालुका कृषि अधीकारी बारामती याच्या मार्गदर्शनाखाली मं.कृ.अ उंडवडी अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पिक रब्बी ज्वारी मध्ये क्राॅपसॅप अंतर्गत शेतीशाळा जराडवाडी येथे विठ्ठल मंदीरामध्ये महीला शेतीशाळा घेण्यात आली.यावेळी ज्वारी पिकावरील मित्र किडी व शत्रुकिडी यांची ओळख करून देण्यात आली.शत्रु किड लष्करी अळीचा जिवनक्रम कसा आहे याचे चित्रीकरण व सादरीकरण केले व लेडी बर्ड बिटल या मित्र किडीचे चित्रीकरण महीलांनी शेतीशाळेत केले .फेरोमण सापळे कसे लावावे याची माहीती देऊन सापळे वाटप करण्यात आले व रासायनीक किटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षीक विशाल जराड यांनी दाखवले कार्यक्रमाचे आयोजन कृषि सहाय्यक माधुरी पवार यांनी केले यावेळी गावचे सरपंच व गावातील महीला सदस्य व ईतर शेतकरी महीला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या .