प्रतिनिधी- अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती व पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघ, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा “शेतीमध्ये इंधन व ऊर्जा बचत ” या विषयावर आतापर्यंत एकूण 22 एकदिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्या आहेत.
यातील दि. ०१/१२/२०२१ रोजी 23वी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये श्री. यशवंत जगदाळे विषय विशेषज्ञ- उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा बचत विषयीचे महत्त्व पटवून दिल्याशिवाय त्यांना यांचे महत्व लक्षात येणार नाही असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान ट्रॅक्टर चालविताना इंधन बचत कोणत्या प्रकारे केली पाहिजे तसेच शेतामध्ये पाईपलाईन, घरामधील स्वयंपाक गॅस बचत , ठिबक सिंचन व मोटार क्षमता कशा प्रकारे निवडावीत याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमात एकूण ४५ शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होत्या. येणाऱ्या काळात ही अजून १५ ते २० कार्यशाळा या ऊर्जा बचत विषयावर आयोजन करणार आहोत असेही श्री. यशवंत जगदाळे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रतन जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी केले व आभार तुषार जाधव यांनी मानले.