प्रतिनिधी – महाराष्ट्र व गोवा सरकार व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र – गोवा एकता कला साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ डॉ.विजयकुमार काळे यांना संमोहनरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मा. श्रीपाद नाईक (केंद्रीय मंत्री, आयुष मंत्रालय, भारत सरकार) , मा. जयेश साळगांवकर (माजी ग्रामविकास मंत्री गोवा), मा. सगुण वेळीप (कला व साहित्य संचालनाय ,गोवा) व मा. विश्वजित फडते (सुप्रसिद्ध सिने अभिनेते) यांच्या हस्ते रवि दि.21 नोव्हें 2021 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह कोल्हापूर येते प्रदान करण्यात आला.
संमोहन उपचार, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास व इतर अनेक विषयांवर प्रेरणादायी व्याख्याने व इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यातील योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला डॉ. काळे म्हणाले की, अशा अनेक मान्यवरांकडून माझा हा गौरव अविस्मरणीय आहे. डॉ. विजयकुमार काळे हे गेल्या
10 वर्षांपासून संमोहन व व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने मी अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक जोमाने हे कार्य करेल असा विश्वास डॉ. काळे यांनी व्यक्त केला.