प्रतिनिधी -कडेठाण, तालुका दौंड येथे ऊस पाचट व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कृषि सहाय्यक श्री प्रकाश लोणकर यांनी प्रास्ताविक केले व श्री पोपट चिपाडे कृषि पर्यवेक्षक पाटस 1, यांनी ऊस पाचट व्यवस्थापन आणि खोडवा ऊस व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले . पाचट कूजवणे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी विष्णू को-हाळे यांच्या शेतावर पार पडले. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी पाचट न जाळणे विषयी शपथ घेतली. कडेठाण गावचे माजी सरपंच प्रेमनाथ दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिस पाटील सुहास दिवेकर , शरद दिवेकर ,भीमराव दिवेकर, नथुराम कोऱ्हाळे व इतर ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सुधीर दिवेकर यांनी आभार मानले.