प्रतिनिधी – एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार विद्यानिकेतन मधील शंभूराज यशवंत जगदाळे इयत्ता – पाचवी व साईराज यशवंत जगदाळे इयत्ता- तिसरी मध्ये शिकत असलेल्या दोन चिमुकल्यांनी दीपावली निमित्त तयार केला आहे ‘शिवनेरी’ किल्ला.
सुरवातीला किल्ला तयार करताना त्यांच्या मनात असे आले की, आपण शाळेमध्ये बऱ्याच किल्ल्याविषयी माहिती घेतली आहे आणि बऱ्याच किल्ल्यांना भेटीही दिल्या परंतु त्या किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, भिंती व बुरुज पडलेले तर काही ठिकाणी पाण्याची व जमिनीची उपलब्धता असताना बरीच जमीन पडीक दिसून आली.
हे सर्व बघितल्यानंतर त्यांना असे वाटले की आपण आपल्या भारत देशाची ही संस्कृती जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे यासाठी या दोघांनी आई वडिलांचे व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले आणि मग झाला राजा शिवछत्रपती महाराज यांचा जन्मकिल्ला ‘शिवनेरी’.
हा किल्ला तयार करताना यामधून बरेच समाज प्रबोधनपर संदेश देण्यात आले आहेत जसे की, सर्व किल्ले स्वच्छ व सुंदर ठेवा, आपली किल्ल्याची संस्कृती व परंपरा जतन करा, मास्क घाला कोरोना टाळा, झाडे लावू आणि पौष्टीक अन्न व भाजीपाला खा आणि निरीगी रहा. सध्या बऱ्याच किल्ल्यावर जमीन व पाणी उपलब्ध आहे याठिकाणी चांगल्या प्रकारे फळपिके व भाजीपाला पिके उत्पादन घेता येऊ शकते हे ही दाखवून दिले आहे.
यामुळे या दोन चिमुकल्या मावळ्यांचे सर्वजण कौतुक करीत आहेत. असेच काम सर्व चिमूकल्यांनी केले तर तयार होणारी नवीन युवा तरुण पिढी आपल्या देशाचे नाव उत्तुंग शिखरावर नेईल यात शंकाच नाही.