माळेगावमध्ये(बारामती) चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मराठी शॉर्ट फिल्म क्रमणिका चा पोस्टर प्रकाशन सोहळा.
प्रतिनिधी( गणेश तावरे) – निर्माता दिग्दर्शक स्वप्नील गायकवाड प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत मराठी शॉर्ट फिल्म क्रमणिका.रविवारी 8 ऑगस्ट ला ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना मुळे सर्व बाबींचा विचार करता अगदी थोडक्या उपस्थितीत समर्थ फिल्म प्रोडक्शन ऑफिस माळेगाव येथे हा सोहळा पार पडला. दिग्गज निर्माते, दिगर्शक, लेखक, कलाकार, यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. बारामती तालुक्यातील सिनेअभिनेते मिसेस मुख्यमंत्री फेम तात्या(गजाननजी गडकर), अभिनेतेआणि झंझट, लॉकडाऊन निर्माते रणजितजी डोळे , लेखक दिग्दर्शक विकासजी जाधव, अतुल साबळे, किरण पवार, रोहित व्हावळ, किरण गाजरे, लेखक भिमराज गायकवाड, निखिल शहा, पायल पिसे, दिशा मांडरे, अक्षय रणदिवे, विजय गायकवाड, पोस्टर डीझायनर विनोद साळवे, अश्विनी तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शॉर्ट फिल्म बद्दल सांगायचं झालं तर क्रमणिका हा शब्द फिल्म इंडस्ट्री मध्ये एखादया फिल्म साठी पहिल्यांदाच वापरला जातोय.युट्यूब च्या सर्च हिस्टरी मध्ये पण क्रमणिका हा शब्द कधी नव्हता.फिल्म इंडस्ट्री ला आम्ही एक नवीन शब्द देतोय.अस दिग्दर्शक स्वनिल गायकवाड यांनी बोलताना सांगितले.
टेलिव्हिजन, थिएटर, नाटक अशा मोठ्या रंगमंचावर काम केलेले कलाकार आपणास या शॉर्ट फिल्म मध्ये पाहायला मिळतील. सहदिग्दर्शक व पटकथा विक्रम पिसाळ यांनी लिहली आहे. कृष्णा राऊत, साहिल गार्डे यांनी छायांकन केलं आहे. संकलन जयदीप पारधे यांनी केलं आहे, सहनिर्माता म्हणून रोहित व्हावळ यांनी काम केलं आहे. सुरज सोनवणे यांनी संगीत दिलंय, तर अभिजित SG यांनी पार्श्वसंगीत दिलंय, विनोद साळवे यांनी पोस्टर बनवलं आहे. गस्त चित्रपट फेम राज पाटणकर मुख्य भूमिकेत आहेत तर दिशा मांडरे नायिकेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. एक वेगळा विषय एक वेगळी कथा क्रमणिका शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून आपल्यासमोर येतेय.सध्या कवचित कुठे तरी शॉर्ट फिल्म गाणं पाहायला मिळत.या फिल्म मध्ये एक छान गाणं सुद्धा आहे.प्रेक्षकांना शॉर्ट फिल्म सोबत एक गाणं सुद्धा पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी रविवारी 8 ऑगस्ट ला समर्थ फिल्म प्रोडक्शन या युट्युब चॅनेल वर ही फिल्म पहावी अस मान्यवरांनी आवाहन केलं.