प्रतिनिधी,दि.31जुलै – काल अंजनगाव या ठिकाणी एक जखमी मोर आढळून आल्याची बातमी बारामती मधील रेस्क्यू टिम ला मिळाली. तत्काळ टीमच्या सदस्यांनी त्या ठिकाणी पोहचवून त्या जखमी मोराला बारामती वनविभागाच्या मदतीने यशस्वीपणे पकडण्यात आले.
5/6 भटक्या कुत्र्यांनी या मोरावर हल्या केला होता .या हल्ल्यात मोर जखमी झाला असून रेस्क्यू बारामती टिमच्या अंतर्गत या जखमी मोरावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. लवकरच या जखमी मोराला उपचारा नंतर त्याच ठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुक्त करन्यात येणार आहे अशी माहिती रेस्क्यू बारामती टिम कडून मिळाली. या बचाव कार्यात वनविभागाच्या सौ.गुरव मॅडम,या गावचे सरपंच सुभाष वायसे तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहित कदम,आदेश राठोड आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मोर हा एक राष्ट्रिय पक्षी आहे त्याच रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बऱ्याच ठिकानी या मोरची तस्करी तसेच मोरपंखासाठी शिकार केलेले आढळून आले आहे असे आढळून आल्यास वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो. कोणत्याही ठिकानी वन्यजीव जखमी आढळून आल्यास तत्काळ आपल्या विभागातील वन विभागाला कळवावे. किंवा बारामती आणि सदर परिसरात कोणताही पशु-पक्षी जखमी स्वरुपात आढळून आल्यास
रेस्क्यू बारामती टीमशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे . 9673581050, 7972161008, 9518358500, 9156565006