भिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२०/७/२०२१ रोजी मिळालेल्या बातमीवरून भिगवण व वालचंदनगर येथे मिळून आलेले तिघे संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा एकूण किंमत ७,५०,३००/- (सात लाख पन्नास हजार तीनशे) रुपयाचा माल जप्त केलेला आहे. तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेविरुद्ध भिगवण व वालचंदनगर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
१) आज रोजी १०.३० वा. चे सुमारास मौजे भिगवण गावचे हदीत पुणे-सोलापूर रोड लगत, एस.टी.स्टॅड समोरील उड्डानपुलाचे खाली, ता.इंदापूर जि.पुणे येथे इसम नामे नामे गणेश गजानन यादव वय २६ वर्षे रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे याचे ताब्यातून १ गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस व स्कार्पिओ जीप असा एकुण किं.रु. ७,००,१००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
२) आज रोजी १६.३० वा.चे सुमारास वालचंदनगर जंक्शन चौक, कळस रोड ता.इंदापूर जि.पुणे येथे इसम नामे १)सचिन बाळू दळवी वय २९ वर्षे रा.वालचंदनगर, रामवाडी ता.इंदापूर जि.पुणे २)सुनिल सुदर्शन खरात वय ३० वर्षे रा.रणगाव , खरातवस्ती ता.इंदापूर जि.पुणे यांचे ताब्यातून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस असा एकुण किं.रु.५०,२००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी सचिन दळवी याच्यावर सन २०१९ मध्ये ॲट्रॉसिटी व सन २०२० मध्ये गुटखा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी सुनील खरात याच्यावर सन २०१३ मध्ये मारामारी व सन २०१९ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

 सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,  

सपोनि. सचिन काळे,
स.फौ. चंद्रकांत झेंडे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,
पोहवा. सुभाष राऊत,
पोहवा. गुरु गायकवाड,
पो.ना. अभिजित एकाशिंगे,
पोकॉ. अक्षय जावळे
यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *