…अन्यथा झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन केले जाईल – पाथरकर

बारामती (प्रतिनिधी) – झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाची फेर सर्वेक्षण करा, झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करा, झोपडपट्टीधारकांना विस्थापित करणारे ठराव तात्काळ रद्द करा, पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीधारकांना पक्की घरे द्या, मुस्लिम समाजाचे दफनभूमी शादीखाना हे प्रश्न तत्काळ मार्गी लावा, मांगारूडी समाजाला समाज मंदिर बांधून द्या, महिला बालकल्याण विभागाच्या योजना मागासवर्गीय महिलांपर्यंत तात्काळ पोचवा. डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहतींमधील नागरिकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.
बारामती नगरपरिषदेने केलेले ठरावाप्रमाणे महापुरुषांचे पुतळे तात्काळ करण्यात यावे. शहरातील डेंगू -चिकनगुनिया- मलेरिया या आजारावरती कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात या मागणीसाठी बारामती नगरपालिका शासन-प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर, जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष उमेश भोंडवे, दत्तू कांबळे ,चव्हाण, लाला अडागळे, सुरेश अडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तात्काळ प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अन्यथा लवकरच नगरपालिके समोर तीव्र आंदोलनाचा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *