बारामती:- माती हा शेतीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून पिकांच्या अन्नद्रव्याचा प्रमुख स्रोत आहे. या घटकाकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यालाच अनुसरून महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम 2021- 22 चे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी कोरटकर, प्राचार्य.आर.जी. नलवडे, प्राचार्य.एस.एम.एकतपुरे, प्राचार्य.एस.आर.अडत, प्राचार्य.डी.एस मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत प्रतिक शेंडे यांनी मळद तालुका बारामती येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण विषयी माहिती दिली. यादरम्यान माहिती देताना कृषिदुत प्रतिक शेंडे यांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान दोन वर्षातून एकदा तरी मातीचे आरोग्य तपासले पाहिजे. मातीमध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन केले.