बारामती : येथील नामांकित विधिज्ञ ॲड. विजय गोपाळराव तावरे यांच्या वकिली व्यवसायाच्या ऑफिसचे उद्घाटन शनिवार दि. २१ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्री. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला लागूनच असणाऱ्या लॉयर्स चेंबर या इमारतीतील एक व दोन नंबरच्या ऑफिसमध्ये अद्ययावत आशा पद्धतीचे फर्निचर अमित जमदाडे यांनी केलेले आहे. उत्कृष्ट पद्धतीचे फर्निचर केल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जमदाडे यांचे देखील कौतुक केले. याबद्दल ॲड. विजय तावरे अँड असोसिएट्स बारामती मध्ये गेली २३ वर्षे वकिली व्यवसायामध्ये आपली सेवा देत आहेत. यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत अनेक पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे. ग्रामीण भागातून येऊन देखील ॲड. विजय तावरे यांनी व्यवसायामध्ये चांगला जम बसविला त्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत ॲड. सुनील वसेकर, ॲड. विकी पोरे, ॲड. संदीप चव्हाण, ॲड. मयुर येवले हे त्यांना मदत करीत असल्याचे ॲड. विजय तावरे यांनी सांगितले.