प्रतिनिधी:- बारामती तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र रणजीत किसन सुळ ह्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परिक्षेत एन टी सी प्रवर्गातुन महाराष्ट्रातुन 14 व्या रॅंक वरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी नूकतीच निवड झाली आहे. त्यामुळे रणजीत ह्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.रणजीत ह्याचे विद्या प्रतिष्ठान इंदापूर येथुन पदविकेचे शिक्षण घेऊन पुण्यातील नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले. 2020 पासुन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला ह्यामध्ये कुटंब नातेवाईक व मित्र परिवारांने पाठिंबा दिला.ह्या अगोदर बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी थोड्या गुणांनी संधी हुकली परंतु निराश न होता अधिक मेहनत व चिकाटीने अभ्यास करून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी परिक्षेत यश मिळविले.