प्रतिनिधी – बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधी यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ ,आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीसमोर ओबीसी व भटकेविमुक्त समाजाने आज तीव्र आंदोलन करून मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतल्याबद्दल व अखंड ओबीसी वर अन्यायकारक भूमिका घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्तमध्ये बारामती तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील प्रतिनिधी उपस्थित राहून पंचायत समितीपासून पदयात्रा काढून प्रचंड मोठ्या घोषणा देऊन या विषयाचे सरकारने गंभीर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रमध्ये आरजगता होऊन ओबीसींचा उद्रेक होऊ शकतो असा सरकारला इशारा दिला आहे. अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी महिलांनी, पुरुषांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनाच आयोजन सकल ओबीसी व भटक्या विमुक्त समितीच्या माध्यमातून ॲड.जी.बी अण्णा गावडे, ज्ञानेश्वर कौले, ॲड.रमेश कोकरे ॲड.गोविंद देवकाते, अनिल लडकत, बापुराव सोनलकर, देवेंद्र बनकर,ॲड.प्रियदर्शनी कोकरे, किशोर मासाळ, राजाभाऊ बरकडे, निलेश टिळेकर, सचिन शाहीर, रोहित बनकर, नितीन शेंडे, ॲड.अमोल सातकर, संदीप अभंग,संजय गिरमे, वनिता बनकर, सागर राऊत,ॲड.दिलीप धायगुडे, दादाराव काळोखे,संतोष काशीद,नाना मदने यांनी केले होते.