शिर्सूफळ येथील सावरकरमळा येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या प्रतिमेला अभिवादन करून “प्रजासत्ताक दिन” साजरा

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी होऊन भारतात प्रजेचे राज्य म्हणजेच प्रजासत्ताक स्थापन झाले या संविधानामुळे जनतेला अनेक हक्क, अधिकार प्राप्त झाले. म्हणून सावरकर मळा, शिर्सूफळ मधील ग्रामस्थ आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ठरविले कि घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब यांच्या फोटो अभिवादन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करायचा.. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिर्सूफळ (ता. बारामती)चे विद्यमान संचालक मा श्री नामदेव (आबा) झगडे हे उपस्थित होते ,तसेच बाळू झगडे, गणेश झगडे, संदीप शिंदे, शिर्सूफळ गावचे उपसरपंच अप्पासाहेब बबन झगडे यांच्या पत्नी सौ. पूजा अप्पासाहेब झगडे, सुरेश आटोळे, वामन झगडे इ सर्व मान्यवर उपस्थित होते सावरकरमळा शिर्सूफळ येथील अंगणवाडी सेविका रंजना कचर शिंदे, आणि अंगणवाडी मदतनीस शिला ज्ञानदेव मांडगे यांनी सर्व ग्रामस्थानचे या कार्यक्रमास उपस्थित राहल्या बदल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *