प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव पवार विधी महाविद्यालय व स्कूल ऑफ आर्किटेक्चर (वास्तूकला महाविद्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर देऊळगाव रसाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, अटल भूजल योजना जनजागृती, मतदान जनजागृती, ग्रंथ दिंडी, महिला व ग्रामस्थ यांचेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध तज्ञ मान्यवरांची व्याख्याने असे उपक्रम राबविले जात आहेत. मा. सरपंच सौ. वैशाली वाबळे, मा. उपसरपंच श्री. दत्तात्रय वाबळे, ग्राम सेवक श्री. दिपक बोरावके यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर, प्राचार्य डॉ. अतुल शहाणे व प्राचार्या आर्कि. राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. विकास बनसोडे, प्रा. अशोक भुंजे व स्वयंसेवक समाजोभिमुख योगदान देत आहेत. या शिबिरादरम्यान जेष्ठ ग्रामस्थ श्री. आनंद रसाळ, श्री. दिपक वाबळे व समस्त ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य प्राप्त होत आहे.