बारामतीतील मुलांचे राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट डिग्री मध्‍ये यश

माळेगाव ( प्रतिनिधी गणेश तावरे ) – राष्ट्रीय स्तरावरील युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया च्या बारामती ब्रँचंच्या 4 मुलानी ब्लॅक बेल्ट 1st डिग्री परिक्षे मधे उत्तीण होऊन बारामतीच्या वैभवात शिरपेच लावला. युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया ही बारामतीतिल पाहिली आय.एस.ओ मानांकन मिळवणारी कराटे या क्रीडा प्रकारातील पहिली संस्था आहे.बारामतीतील अनेक खेळाडुना राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळवुन अनेक पदकांची कमाई केली आहे.बारामतीतील श्रीरामनगर येतील 4 मुल ब्लॅक बेल्ट 1st डिग्री परिक्षे मधे उत्तीण झालेली आहेत आरोही गणेश जगताप,स्वामिनी विक्रम घाडगे,शिवराज मंदार शेरे व शिवम अनिल कदम यानी ब्लॅक बेल्ट 1ली डिग्री मिळवली.आरोही जगताप ही सगळ्यात लहान असुन तिने वयाच्‍या अडीच वर्षां पासुन कराटेच प्रशिक्षण घेत आहे.तसेच बाकीची मुल गेली 4 वर्षा पासुन कराटेच प्रशिक्षण घेत आहेतअसे संस्थेचे प्रमुख शिहान गणेश भिमराव जगताप यानी संगितले. सर्व यशस्वी मुलांचे बारामती पंचक्रोशीतुन कौतुक होत अहे.बारामती नगर परिषदेचे मा उप नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव,बिरजुभैय्या मांढरेे,अॅड.सूरज बनकर,अॅड.गणेश कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते रतिलाल मासाळ,अॅड.सुनिलभाऊ शिंदे,विकास गुळुमकर सर,अतुलशेठ गोटे,प्रशांत गाढवे यानी सर्व मुलाना पुठील वाटचाली साठी शुभेच्‍या दिल्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *