विकसित भारत संकल्प यात्रेत २६ हजार नागरिकांनी घेतला विकसित भारतासाठी संकल्प

बारामती, दि. ३: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून बारामती तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची ८० गावात जनजागृती करण्यात आली असून यात्रेत २६ हजार २६८ नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.

केंद्र शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन तालुक्यात आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ४५ हजार ७६२ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

केंद्र शासनाच्या योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन माहिती घेत आहेत. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. आपल्या गावाताच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

यात्रेदरम्यान आयोजित आरोग्य शिबारात ३ हजार २४९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये क्षयरोगी आजाराच्याअनुषंगाने २ हजार ४६८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. पीएम सुरक्षा विमा योजनाअंतर्गत ७४८, पीएम जीवन ज्योती विमा योजनाअंतर्गत ६८० नागरिकांची नोंदणी करण्यात आली. तसेच ६८ प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड वितरीत करण्यात आले.

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ११ नागरिकांची नोंदणी करण्यात आली. ३ हजार ४७७ महिला, २ हजार ९६८ विद्यार्थी, २ हजार २१७ खेळाडू आणि १ हजार ४३५ स्थानिक कलाकार कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. ८० शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. तसेच ६७ संगणकीकृत अभिलेख्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.

यात्रा ४ जानेवारी रोजी मगरवाडी व चौधरवाडी, ५ जानेवारी रोजी करंजे व सारेटेवाडी, ६ जानेवारी रोजी सस्तेवाडी व करंजेपुल, ७ जानेवारी रोजी वाणेवाडी व मुरुम आणि ८ जानेवारी रोजी वाघळवाडी व निबुंत येथे येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *