विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार

पुणे, दि. २५:- विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना एकरकमी रुपये दहा हजार व रुपये पंचवीश हजार इतक्या रकमेचे विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली आहे.
यामध्ये खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार, (इयत्ता १० वी व १२ वी मंडळाच्या परिक्षेमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले पाल्य), पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक/पत्नी / पाल्य, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्य, यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळविणारे, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळविणारे अशांचा समावेश करण्यात आलेला आहे.
विशेष गौरव पुरस्कार मिळण्याबाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे अर्ज २० सप्टेंबर २०२१ पूर्वी सर्व कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *