समिंद्राताई सावंत यांना बीजमाता पुरस्कार प्रदान.

माळेगाव, प्रतिनिधी (गणेश तावरे ) – सद्गुरु शांतीदास महाराज ट्रस्ट यांच्या वतीने श्रीदत्त जयंती निमीत्त शांतीदास नगर गोखळी, ता. फलटण, जि. सातारा येथे अनेक वेगवेगळया सामाजिक कार्यातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये विशेष कार्य म्हणून पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाने व SPK तंत्राने पिकवलेल्या शेतीमधून गेली 9 वर्षापासून विषमुक्त भाजीपाला व दुर्मिळ गावरानी बीयांचे 140 पेक्षा जस्त प्रकार जतन करुन त्यांचे ,संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बीजमाता म्हणून समिंद्राताई वाल्मीक सावंत सावंतवाडी, बारामती, पुणे. यांना सद्गुरु शांतीदास महाराज ट्रस्ट चे ट्रस्टी व कार्यक्रमाचे आयोजक वस्ताज श्री. अनिलकाका गावडे-पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरव आला. व तो त्यांच्या सुनबाई अर्चना मिलिंद सावंत यांनी स्वीकारला.

त्यांच्याकडे वेगवेगळ्या अनेक दुर्मिळ गावरानी वाणांच्या पालेभाज्या, रानभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, लष्करी वाल, कडधान्य, धान्य, कंदमुळे, तेलवान, फुले व मिलेट्स /तृणधान्य च्या सर्व मिळून 140 प्रकार कार्यक्रम स्थळी प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी हजारो भाविक, शेतकरी यांनी गावरानी बियांचे संकलन पाहून समाधान व्यक्त केले व बारामती नॅचरल SPK शेतकरी गटाचे शेतकरी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *