बारामती दि.24: ऑल इंडिया संपादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी संघाच्या महाराष्ट्र प्रदेश विधी व न्याय विभाग कायदेशीर सल्लागार पदी ॲड.राजकिरण शिंदे, ॲड.अमोल सोनवणे,ॲड.अजित बनसोडे,ॲड.मेघराज नालंदे,ॲड.बापूसाहेब शीलवंत तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय कायदेशीर सल्लागार पदी ॲड.कमाल मुलाणी,ॲड.किशोर मोरे,ॲड.वैभव शेलार,ॲड.मनिष गायकवाड तसेच
पुणे जिल्हा प्रेस फोटोग्राफर प्रशांत कुचेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
ऑल इंडिया संपादक संघाचे संघटन महाराष्ट्र राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये असून संपादक,पत्रकारांना येणाऱ्या कायदेशीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदरची लीगल टीम काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष स्वप्निल कांबळे यांनी बोलताना सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मीटिंग हॉल येथे करण्यात आले होते.यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अजय लोंढे, पुणे जिल्हा महासचिव भीमसेन उबाळे, पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष प्रतीक चव्हाण,बारामती तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे, इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष सवाणे, बारामती शहर उपाध्यक्ष जितेंद्र जगताप, बारामती तालुका उपाध्यक्ष महेंद्र गोरे,पत्रकार योगेश नालंदे, मन्सूर शेख,अशोक साळुंके यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र भारतीय संविधानाची उद्देशिका प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी ॲड.अमोल सोनवणे,ॲड.अजित बनसोडे,ॲड.मेघराज नालंदे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले व आभार दशरथ मांढरे यांनी मानले.