बारामती, दि. २०: तालुका फळरोपवाटीका, कन्हेरी येथे कृषी विभागाची विभागस्तरीय संरक्षित शेती कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवडी, अधीक्षक कृषी अधिकारी फलोत्पादन सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी रश्मी जोशी, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल तसेच पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत पॉलीहाऊस, शेडनेट यांचे प्रकार, उभारणी, अनुदान परिगणना, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची मोकातपासणी याबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. डाळींब व द्राक्ष पीकांकरीता गारपीट संरक्षित जाळी, साहित्य, तपासणी व अनुदान परिगणनाबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यशाळेनंतर कन्हेरी फळरोपवाटीका प्रक्षेत्रावरील विकासकामे, मातृवृक्ष लागवड, पॉलीहॉऊस, शेटनेटची पाहणी करण्यात आली.