७ डिसेंबर दिल्ली येथे आरक्षणाचा पाळणा गात केले अनोखे निषेध आंदोलन …

खासदार विनायक राऊत यांनी घेतली आंदोलन कर्त्याची भेट, संसदेत मुद्दा घेत दिले समर्थन…

प्रतिनिधी – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ( ST आरक्षण) अंमलबजावणी करणेसाठी धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अति मागासलेल्या समाजाला घटनेच्या कलम ३४०, ३४१ ,३४२ अन्वये सोयी सवलती दिले आहेत त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश सुधारणा कायदा १९५० व १९७६ या कायदा क्रमांक १०८ नुसार परिशिष्ट (१)मधील भाग (९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमांक ३६ वर ओरान ,धनगर या जातीचा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीमधे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. बिहार, झारखंड, ओरिसा मधे ओरान, धनगर (Oraon, Dhangar) हे अनुसूचित जमातीच्या यादी मधे आहे.

धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही, घटनेत असलेले आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलने, मोर्चे करत आहे. राज्य सरकार पुन्हा शब्दछल करत फसवणूकच करत आहे ,त्यामुळे धनगर जमातीचा रोष वाढत चाललेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलेल्या शब्दाचे पालन करावे , असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले .

प्रमुख मागण्या १) राज्यघटनेप्रमाणे एस.टी.चे प्रमाणपत्र मिळणे. २) ओबीसी ची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ३) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करणे. ४) ओबीसी आरक्षण, महीला आरक्षण व महिला संरक्षण साठी योग्य व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. ५) मेंढपाळांसाठी संरक्षण व मेंढ्यांसाठी राखीव चराई क्षेत्र व विमा उपलब्ध करणे. ६) बेरोजगार युवकांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे जास्त रोजगार निर्माण होण्यासाठी उचित पाऊले उचलावीत. संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या मुद्दयांवर मतांचे राजकारण करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांनी चिंतन करावे आणि पुढील काळात समाजाची मते ग्रुहीत धरू नये .येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धनगर समाज मतांमधून आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य व केंद्र सरकारने घ्यावी, असे परखड मत क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केले. ७ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात निषेधार्ह धरणे आंदोलन करण्यात आले, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष लक्षवेधी घेत सरकारने याची दखल घ्यावी. यासाठी याठिकाणी यळकोट यळकोट… जय मल्हार, आरक्षण अमलबजावनी झालीच पाहिजे… एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे… ओबीसी जनगणना झालीच पाहिजे… फसव्या सरकारच जाहीर निषेध…या घोषणांनी जंतर मंतर मैदान दणाणले. यावेळी या महिलांनी बाळा जो जो रे… हे अंगाई गीत गात सरकारला झोपवण्याचा इशारा पाळणा आंदोलनातून दिला.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या भवन कार्यालय मधे निवेदन देण्यात आले.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भेट देत समर्थन दिले व आपले मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेची बाजू त्यांनी यावेळी व्यक्त केली व राष्ट्रपती यांच्याकडे धनगर व मराठा आरक्षण साठी पाठपुरावा संसदेमध्ये धनगर आरक्षण मुद्दा घेत समर्थन दिले.यावेळी जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीभाई पटेल ,उत्तर प्रदेश सरकारचे पूर्व राज्यमंत्री सतीश पाल, रिटायर्ड एसीपी सूर्यकांत पाटील ,मधुसूदन होळकर, रमेश वर्मा, अजय पाल सिंग, रामप्रकाश होळकर ,पवन पाल, जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीभाई पटेल ,उत्तर प्रदेश सरकारचे पूर्व राज्यमंत्री सतीश पाल, महाराष्ट्र महाराष्ट्रातून सरपंच बाळासाहेब जोशी पंचायत समिती सदस्य विठ्ठल आदमाने, आशा रुपनवर, अश्विनी पाटील, लक्ष्मी करे, वृषाली मासाळ रोहिणी मारकड आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या. सर्व बंधू भगिनी या ठिय्या आंदोलन मधे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *