‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘ सेल्फी विथ मेरी माटी’ या मोहिमेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या उपक्रमासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाने केलेल्या कार्याची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतली तसेच समाजातील विविध घटकांतील सहभागींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामतीस सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सभागृह, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला. संस्थेच्या वतीने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे व डॉ.विलास कर्डीले यांनी सन्मान स्वीकारला. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा को-ओर्डीनेटर डॉ.विलास कर्डीले यांचा देखील सन्मान करण्यात आला. मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील उत्स्फूर्त सहभागींचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शाह वाघोलीकर व सचिव मा.श्री.मिलिंद शाह वाघोलीकर, मा.प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले.