पुणे दि. २६: महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी/जेईई/एनईएफटी-२०२५ चे परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ९२ पात्र विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, मुलांचे शासकीय वसतिगृह भोरचे गृहपाल श्रीकांत आव्हाड, गृहपाल, समाजकल्याण निरिक्षक वैभव लव्हे, विभागीय समन्वयक पल्लवी कडू आदी उपस्थित होते.
श्री.लोंढे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. आपली बलस्थाने ओळखून त्यानुसार पुढील क्षेत्र निवडावे तसेच सदर टॅबलेट व सिमकार्डचा वापर पुढील शैक्षणिक कामकाजासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.