पानसरे कुटुंबियांकडून महापुरुषांच्या पुस्तकाच्या माध्यमातून वारसा जपण्याचे काम

प्रतिनिधी – कै.ज्ञानदेव विठ्ठल पानसरे यांच्या स्मरणात पुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसरेवाडी व तरटे वस्ती तसेच विद्या प्रतिष्ठानचे सुपे इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसरेवाडीचे मुख्याध्यापिका येळे मॅडम, कुतवळ सर, तरटे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका चांदगुडे मॅडम, प्रदीप काळखैरे सर, पानसरेवाडी अंगणवाडीच्या शिक्षिका कोंडे मॅडम मदतनीस कमलबाई, शाळा व्यवस्थापन समिती,पानसरेवाडीचे सरपंच राजेंद्र पानसरे सहकारी मित्र अतुल ढम, वैभव भापकर, सागर चांदगुडे उपस्थित होते. तसेच विद्या प्रतिष्ठानचे सुपे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य योगेश पाटील सर कॉलेजचे प्राचार्य राहुल पाटील सर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *