इम्रान तांबोळीला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक प्रदान…

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणजेच आपल्या बारामतीचा अभिनेता इम्रान तांबोळीला गेल्या ५८ वर्ष चालू असलेली स्पर्धा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाऊसपाड्या या एकांकिकेत पाऊस पाड्या या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता नैपुण्य हे पारितोषिक त्याने मिळवलं आहे. याआधी इम्रानने गेट टू गेदर सिनेमा मधे प्रमुख भूमीका केली आहे तसेच. यापूर्वी त्याने बऱ्याच एकांकिकेत प्रमुख भूमिका केल्या आहेत, लवकरच इम्रान आपल्याला हिंदी वेब सिरीज मधे दिसेल त्यामध्ये सुद्धा लीड रोल म्हणजेच प्रमुख भूमिकेत आपल्याला इम्रान दिसणार आहे, आणि लवकरच नवीन प्रोजेक्ट ही सुरु होतील अशी माहिती इम्रान च्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *