बारामती दि.14: तलाठी सज्जावरील तलाठ्यांच्या उपस्थिती बाबत शासन परिपत्रक महसूल व वन विभागाचे असे आहे की, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कार्यालयाच्या दर्शनी तलाठ्याचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या, दूरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक, शासनाने उपलब्ध निवासस्थाने अशी विविध नमूद सेवाविषयक बाबींची विविध उतारे कालावधी माहीतीचा तपशील इत्यादी कार्यालयाच्या आवारात लावावा. अशा प्रकारे आहे पण या सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत म्हणून दि. 5 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी त्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश पारित करण्यात यावे असे निवेदन बारामती तहसीलदार यांना दिले होते.
सदर निवेदनाची दखल घेत बारामती तहसीलदार यांनी दि.13 सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना कार्यालयाच्या दर्शनी भागावर बोर्ड लावण्याचे व सदर निवेदन अर्जातील 1 ते 8 मुद्द्यांच्या बाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.