प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयाचा इन्व्हर्नमेंट फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मृदगंध 2023 या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.या स्पर्धेत बारामती व परिसरातील सर्व शाळा या स्पर्धेसाठी सहभागी झाल्या होत्या.या विवीध सामाजिक संदेश प्रसारित करणारे कार्यक्रम विद्यार्थांनी सादर केले.टेक्निकल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर नाटिका सादर केले.या नाटिकेला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.तसेच उत्कृष्ट स्त्री अभिनय म्हणून कु.यशोधरा खरात हिला सन्मानित करण्यात आले.या नाटिकेत संस्कृती दळवे,समर्थ राऊत,यशोधरा खरात,वैष्णवी कुंभार,श्रेया कळसाईत,भार्गव देवकाते,प्रियांशी बोबडे,संग्राम फोडलकर,विनय राऊत,पार्थ काळे,आयुष भोसले,हर्षद शिंदे हे सर्व विद्यार्थी सहभागी होते.या सर्व विद्यार्थांचे व श्रीमती रुपाली तावरे,श्रीमती सुजाता गाडेकर,प्रवीण राठोड या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटी चे सदस्य सदाशिव(बापूजी) सातव, विद्यालयाचे प्राचार्य मोरे पी.पी.उपमुख्याध्यापक देवडे के.डी.पर्यवेक्षक श्री निवास सणस सर्व शिक्षक यांनी केले.या सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जाधव यांनी तर आभार पर्यवेक्षक निवास सणस यांनी मांडले.