प्रतिनिधी, गणेश जाधव – ढेकळवाडी, तालुका बारामती येथे शिवराज जाचक परिवाराच्या वतीने प्राथमिक शाळेतील मुलांना मोफत शालेय पुस्तके वाटप प्रसंगी नामदेवराव शिंदे बोलत होते. याप्रसंगी गावचे सरपंच सीमा झारगड, उपसरपंच शुभम ठोंबरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोरकर, राहुल झारगड, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुरज तावरे उपस्थित होते. देशाचं भवितव्य घडवण्याची क्षमता ग्रामीण भागातील मुलांमध्ये आहे. कोरोना काळामध्ये मदतीची भावना मोठ्या प्रमाणात पुढे आली, त्यामुळे गरजू उपेक्षित वंचित लोकांना त्याची मदत झाली. जाचक परिवार पहिल्यापासूनच सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यतत्पर आहे. त्याचा वारसा शिवराज जाचक करत आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलं.
यावेळी शिंदे साहेबांची कार्यपद्धत सर्वसामान्यांना न्याय देण्याची असते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतो अशी भावना ढेकळवाडी च्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. शहरापेक्षा ग्रामीण लोकांचे प्रश्न खूप मोठे आहेत, मला जर ग्रामीण लोकांची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागाची जबाबदारी जर मिळाली तर ती समर्थपणे पार पाडू आणि पोलीस सेवे बरोबरच सामाजिक उपक्रमांना आपण मोठ्या प्रमाणात न्याय देऊ असं शिंदे यांनी यावेळी मत व्यक्त केलं.