ग्रामीण भागातील खेळाडूसाठी असे उपक्रम व्हावेत
माळेगाव ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा कु. भाग्यश्री धायगुडे यांनी पुणे ते बारामती भव्य रिले (१११ किलोमीटर) रनचे आयोजन केले होते. अजितदादा पवार यांचे पुणे येथील निवासस्थान जिजाई बंगला येथुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकाळी झेंडा दाखवून रिले रनचे उदघाटन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवती जिल्हाध्यक्षा पूजा बुट्टे उपस्थित होत्या. पुणे ते बारामती रिले रनचा सांगता समारंभ राष्ट्रवादी भवन कसबा, बारामती येथे टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी होळकर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, वैशाली नागवडे, बन्सी आटोळे, जयसिंग देशमुख, प्रशांत काटे, सचिन सातव, मदननाना देवकाते, येळे सर, शिवाजी टेंगले, रोहीत कोकरे, राहुल वाबळे, आरती शेंडगे, संजय सोनवणे, कोच अजित लोणकर इत्यादी उपस्थित होते. सांगता समारंभ प्रसंगी तालुका युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रावहिनीसाहेब यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतो. ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धेमध्ये भाग घेणे कामी प्रोत्साहन मिळणे करिता युवा नेते पार्थ पवार यांचे वारंवार मार्गदर्शन असते, यातूनच या स्पर्धेचे आयोजन केले. भारताने जी ऑलिंपिक पदक आणलीत ही आपल्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या रिले रन मधून ग्रामीण भागातील मुलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि यातून नककी चांगले खेळाडू तयार होतील असा माझा विश्वास आहे. केकेबी रनर्स ग्रुपच्या मुलांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक वाटते. पुणे ते बारामती दरम्यान रिले रन होत असताना सर्व गावो-गावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने रिले रन स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या केकेबी रनर्स ग्रुपचे स्वागत केले व त्यांचे मनोबल वाढवले याबद्दल आणि पोलीस प्रशासनाचे देखील भाग्यश्री धायगुडे यांनी आभार मानले.