प्रतिनिधी – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील गणित विभागातील प्रा.शैला जाधव यांना जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांनी नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय ‘Multiple Integral Transform and their applications ‘ असा होता. जेजेटी युनिव्हर्सिटी राजस्थान येथील डॉ.विनिता बसोटीया यांनी शोधनिर्देशक म्हणून तर विद्या प्रतिष्टान कमलनयन बजाज इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ.हिवरेकर ए.पी. यांनी सहशोधनिर्देशक म्हणून त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.शैला जाधव या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात गणित विभागात गेल्या १३ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. त्यांनी बीएस्सी व बी.एस्सी.कॉम्युटर सायन्स या वर्गांकरिता दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध परिषदांमध्ये सहभागी होवून संशोधन प्रबंध सादर केलेले आहेत.
प्रा.डॉ.शैला जाधव यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.