टेक्निकल विद्यालयात श्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत 1100 विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा इ 5 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. यातील 5 वी ते 10 वी पर्यंतचे 1100 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थांनी विविध विषयांवर चित्र रेखाटन केले. यावेळी अनेक विद्यार्थांनी मा. अजित पवार यांचे चित्र रेखाटन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक श्री निवास सणस तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सदर स्पर्धेचे आयोजन विद्यालयातील कलाशिक्षिका सौ. रुपाली तावरे व श्रीमती सुजाता गाडेकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *