बारामती – पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि:१५) रोजी होलार समाजाच्या वतीने सुरज देवकाते यांनी सर्वे नंबर २२०,अनंत आशा नगर या ठिकाणी ‘स्वच्छता अभियान व वृक्षारोपण’ कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान पाटील बोलत होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, कै.वस्ताद बाजीराव काळे दहीहंडी संघाचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज काळे, महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड, सेवा दलाचे अध्यक्ष अँड. धीरज लालबिगे, युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव,महाराष्ट्र पत्रकार सेवा संस्था बारामती तालुकाध्यक्ष गोरख पारसे, पत्रकार तानाजी पाथरकर, पत्रकार मन्सूर शेख, पत्रकार तैनूर शेख, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज केंगार, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी सरचिटणीस विजया खटके, मीनाताई गोरे, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, आदित्य हिंगणे या सह पदाधिकारी उपस्थित होते.
शरदचंद्रजी पवार,अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होलार समाजाला नोकरीत, शिक्षणात तसेच विविध शेत्रातील उद्योग व्यवसायात नक्कीच मदत मिळणार असल्याचे मा. नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी बारामती नगरपरिषद मधील महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व केक कापण्यात आला.
विशाल जाधव, अँड धीरज लालबिगे यांनी मनोगत व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी विजय अहिवळे,भारत देवकाते, बाळासाहेब जाधव, नारायण ढोबळे, ईश्वर पारसे, बाळासाहेब देवकाते, शेखर अहिवळे, गणेश गुळवे, शांताराम गुळवे, शांताराम लालबिगे,भारत पारसे, उमेश कांबळे,विनोद जाधव,आदींनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.