बारामती प्रतिनिधी (गणेश तावरे) – दिंनाक ८.०६.२०२३ रोजी ते दिनांक १२.६.२०२३ रोजीच्या दरम्यान इंदापूर बस स्थानका जवळ असलेल्या टाटा इंडिकॅश एटीएम मधून १७ लाख ५५ हजार रूपये चोरीस गेल्याबाबत
इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. सदर चोरी झालेल्या टाटा इंडिकॅश एटीएम मधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने, एटीएम मशीन येथे सिक्युरिटी गार्ड नसल्याने तसेच चोरी झालेल्याची निश्चीत वेळ माहिती नसल्याने तपासामध्ये बरेच अडथळे येत होते. गुन्हेशोध पथकाने इंदापूर शहारातील तसेच दौंड, शिकारपूर, रांजणगाव, उरळी कांचन परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-यांची पाहणी करून तसेच तांत्रिक माहिती वरून इसम नामे. १ रचपाल बलदेव सिंह वय ३६ वर्षे, रा. बाबा दिपसिंग नगर, रोड नंबर १, भंटिडा, राज्य – पंजाब, २. लखवीर बलदेव सिंह, वय २९ वर्षे, रा. रायखाना, ता.तलवंडी सापो, जि. भंटिंडा, राज्य – पंजाब यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपी क्र. १ रचपाल सिंह हा पुर्वी बॅकेत नोकरी करत होता, त्यामुळे त्यांना एटीएम मशीन बाबत माहिती असून आरोपीत यांनी एटीएम मशीन खोलून त्यामध्ये पैसे भरण्याची कॅसेट जवळ स्पाय कॅमेरा बसून एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉडींग मधून बघून त्यांनतर एटीएम मशीन उघडून त्यातील सर्व १७ लाख ५५ हजार रूपये चोरी केले आहेत. सदरचे आरोपीत हे सराईत असून त्यांनी यापुर्वी सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), गंगापूर ( राजस्थान), कोटा (राजस्थान) पठाणकोट (पंजाब), उत्तराखंड राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केलयाचे तपासात निष्पन्न झालेले आहे. आरोपी यांना मा.न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड दिलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे हे करित आहेत. सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री. अंकित गोयल सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.आनंद भोईटे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सफौ. प्रकाश माने, पो. हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.