दौंड प्रतिनिधी – दि 14, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या पूणे येथील विभागीय केंद्राचे अटारी संचालक , डॉ. लखण सिंग यांनी आज दौंड तालुक्यातील खोर गावाला भेट देऊन एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी गावचे सरपंच श्री. संदीप अटोळे, अंजीर उत्पादक संघाचे संचालक श्री. समीर डोंबे व के. वी. के. चे वैभव घाडगे उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राने खोर गाव दत्तक घेतले आहे व गावामध्ये विविध विकास कामे सुरू केली आहेत त्याची पाहणी केली त्यामध्ये श्री.गणेश डोंबे, व श्री.उत्तमराव डोंबे यांची मिरची व वांग्याचे कलमी रोपंपासून लागवड केलेले प्लॉट पहिली, समीर डोंबे यांची अंजीर प्रक्रिया व पवित्र ब्रँड माहिती घेतली, गावात सुरू असलेल्या नाले खोलिकरणाची कामे पहिली. याच कार्यक्रमात अंजीर पिकासाठी खत व्यवस्थापन साठीच्या खतांचे प्रात्यक्षिकचे वाटप त्यांचे हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांनी येत्या काळात आपला शेतीमाल स्वतः ग्राहकापर्यंत विक्री करावा म्हणजे आपणास जास्त फायदा होईल असे त्यांनी सांगितले. केंद्रा मार्फत सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. श्री. समीर डोंबे यांनी आभार मानले व वैभव डोंबे यांनी सूत्र संचालन केले.