ग्लोबल शेपर्स कमुनिटी बारामती हब व विद्यानंद फाउंडेशन च्या माध्यमातून पर्यावरणपूरक तीस हजार पानाच्या पत्रावळीचे वाटप

प्रतिनिधी – वारी एक आपल्या संस्कृतीचा अभूतपूर्व सोहळा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला संत तुकाराम महाराजांनी त्यावरती कळस चढवला आपली संत परंपरा अशीच चालू राहिली संतांनी त्यांच्या अभंग वाणी मधून समाजास अनेक शिकवणी दिल्या अनेक रूढी परंपरा यांचं उच्चाटन केलं एवढंच नाही तर संतांनी जगण्याचं महत्त्व समाजा मध्ये सर्वाना सांगितलं याच विचारांची जोड धरून ग्लोबल शेपर्स कॅमुनिटी बारामती हब व विद्यानंद फाऊंडेशन च्या माध्यमातून वारी मार्गावर पर्यावरण पूरक पत्रावळी च वाटप करण्यात आलं. 30000 वारकऱ्यांना या पत्रावळ्या वाटण्यात आल्या आहेत फक्त न वाटपच न करता त्याच विघटन कस होऊल यासाठी पण बारामती हबच्या माध्यमातून काम केलं आहे. त्याच प्रमाने महिलांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था ग्लोबल शेपर्स बारामती हब च्या माध्यमातून करण्यात आली होती, पर्यावरण ला प्लस्टिक चा घातक पणा लक्षत घेऊन जास्तीतजास्त पानाच्या पर्यावरण पूरक पत्रावळी चा वाटप केले आहे त्याच प्रमाणे पालखी स्थळावर वृक्षारोपण करण्यात आलं नविन पालखी महामार्ग मुळे झाडांचं प्रमाण कमी झालं आहे ते लक्षात घेऊन देहू संस्थानाचे अध्यक्ष व संत तुकाराम महाराजांचे वंशज मा.शिवाजी मोरे महाराज, सोहळा प्रमुख वंशज मा.भानुदास मोरे महाराज, विद्यानंद फाऊंडेशन चे प्रमुख मा.आनंद लोखंडे, बारामती पंचायत समितीचे सर्व अधिकारी, बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख मा.दिलीप जगताप आरोग्य सेवक पुष्कराज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. बारामती हबच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाच देऊ संस्थांना मार्फत कौतुक करण्यात आलं असे स्तूतपूर्ण उपक्रम त्यांनी चालू ठेवण्याच आव्हान केलं. देवयानी पवार, शंतनु जगताप, फातिमा खायमखनी, शुभम ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ काटे, माऊली खाडे, अखिलेश सूर्यवंशी, भारवी मूलमूले,शेखर जाधव, खडीजा खायमखनी, ओंकार कोकरे व पांडुरंग अडसूळ यांनी हा उपक्रम विशेष मेहेनती ने यशस्वी पार पाडला. बारामती हबने घेतलेल्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम या समावेश आहे. त्यांनी 4000+ पेक्षा जास्त देशी झाडे लावली आणि दुष्काळग्रस्त वनजमिनीवर 1000 सीड बॉल्स दिले, ज्यामुळे परिसरात अधिक ऑक्सिजन निर्माण होण्यास मदत झाली. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. बारामती  हबने मानसिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही काम केले आहे.आणि अजून हि त्याच जोमाने काम चालू आहे बारामतीच्या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास कसा होईल याचा प्रामाणिक प्रयत्न बारामती हब चे सर्वशेपर्स करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *