प्रतिनिधी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने बारामती येथील गार्डन परिसराची स्वच्छता करण्यात आली. दिनांक ५ जून 2023 रोजी विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस निमित्ताने स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ यांच्या हस्ते सुरुवात झाली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षीची थीम प्लास्टिक प्रदूषणावर उपाय ही होती. या थीमच्या अंतर्गत पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दि. 3 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नक्षत्र गार्डन येथे सौ सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ श्री अनुज खरे यांच्या उपस्थितीत नेचर बॉक्स चे आयोजन करण्यात आले. दि. 5 जून 2023 रोजी बारामती येथील गुल पुणावाला गार्डन, रेल्वे परिसर, तसेच महाविद्यालयाच्या आवारातील प्लास्टिक कचरा संकलन करून त्याचे निर्मूलन केलं गेलं. पर्यावरणाच्या समस्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, लोकांना या अभियानामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, तसेच पर्यावरणीय सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी, सक्रिय कार्यकर्ता बनण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून जनजागरण केले. पर्यावरणचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण चला एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करू त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार घेऊ अशी प्रतिज्ञा केली घेतली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ अनंत शेरखाने, प्रा. रेश्मा नवले, डॉ. बिपिन पाटील, श्री विनोद कुमार लोखंडे, श्री. किरण थोरात हे उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.