अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे 31 मे रोजी आयोजन

अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे 31 मे रोजी आयोजन

पुणे, दि. 25 : महिलांसाठी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी, त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे बुधवार ३१ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर मुलींची शाळा क्र.७४ पौड फाटा पुणे (दशभुजा गणपती मंदिर जवळ) येथे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीराला विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या शिबीरास उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असेही आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी प्रकल्प) यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )