फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

बारामती दि. २४: कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे करण्यात आले.

यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, हवामान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय मोरे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.धीरज शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय मोरे यांनी भारतीय हवामानाची व पर्जन्यमानाची विस्तृत माहिती देवून चालू हंगामात हवामान विभागाकडील पर्जन्यमान अंदाज व हवामान बदलाबाबतच्या अंदाजाची माहिती दिली. फळबाग लागवड करताना हवेतील आर्द्रता, कोरडी हवा, हवेचा वेग किती असावा, कोणती फळपीक घ्यावे, हवामानात होणाऱ्या बदलामुळे पिकांमध्ये किडींचा रोग मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतो याचीही त्यांनी माहिती दिली.

डॉ.धीरज शिंदे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास तालुक्यातील फळबाग लागवड करणारे शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )