प्रतिनिधी – शेतकऱ्यांना थ्री फ्युज लाईट रेग्युलर मिळावी. वाढीव लाईट बिल कमी करणे तसेच, शेतीपंपांना स्वतंत्र लाईट मीटर बसविणे. महावितरण लाईट थ्री फ्युज सहा तास देते ती सुध्दा व्यवस्थित मिळत नाही. त्याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे, लाईट वापरात कमी येते मात्र शेतकऱ्यांची बिले वाढवून येतायेत. एक तर शेतकऱ्यांच्या पिकांना लाईट व्यवस्थित मिळत नसल्याने पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. उत्पन्न कमी मोबदला कमी लाईट बिले जास्त येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेती पंपांना स्वतंत्र लाईट मीटर बसविले पाहीजे. जेणे करून जेवढी लाईट वापरली जाते तेवढेच बिल आकारले जाईल. अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा. धनंजय गावडे कार्यकारी अभियंता महावितरण बारामती ग्रामीण यांना देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांबाबत गांभीर्यने विचार केला नाही तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेड रस्ता रोको आंदोलन करेल व याला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल असे पोलीस प्रशासनालाही निवेदना द्वारे कळवले आहे.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप ,लक्ष्मण जगताप मा संचालक माळेगाव सह साखर कारखाना शिवनगर उपस्थित होते