प्रतिनिधी- उज्वल प्रतिष्ठान जळगाव सुपे, सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, इन लक्स बुद्रानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 85 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये हृदयरोग निदान, मधुमेह तपासणी, कान नाक घसा तपासणी, दातांची तपासणी, तसेच नेत्र तपासणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरामध्ये लाभ घेणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल उपचारांमध्ये 30 टक्के सवलत दिली जाणार आहे तसेच मोफत नेत्र तपासणी व आवश्यक असल्यास चष्मा व शस्त्रक्रिया याबाबत सांगितले जाणार होते. हे शिबिर माळवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे रविवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत संपन्न झाले. ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद या शिबिराला दिला. यावेळी डॉ बाळासाहेब सोनवणे, डॉ प्रशांत सोनवणे, डॉ प्रीती सोनवणे, डॉ सोनाली सोनवणे, डॉ वैभव गाढवे, सविता पवार, सुनीता कांबळे, नंदू दादा लोणकर जगन्नाथ दादा जगताप, सरपंच निर्मला लोणकर, उपसरपंच दत्ता लोणकर, सदस्य मंजू लडकत अनिल लडकत व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.