प्रतिनिधी – दिनांक ५ मे २०२३ रोजी कृषि विभागामार्फत शिर्सुफळ येथे बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आयोजन केले होते शेतकरयांनी घरच्या घरी बियाणे. उगवण क्षमता चाचणी घेऊन त्यानुसार बियाणे पेरणीसाठी वापरण्याची पद्धत उत्कृष्ट असल्याचे व बियाणे वरील खर्च कमी करणे तसेच पीक उत्पादन खर्च कमी करून उत्त्पन्न वाढविणे प्रमुख उदेश असल्याचे यावेळी कु प्रतीक्षा दराडे कृषि सहाय्यक यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक द्वारे यावेळी सांगितले. याप्रमाणे सोयाबीन, कांदा असे इतर पिकांचे पेरणी पूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी घेता येत असल्याचे प्रतीक्षा दराडे कृषि सहाय्यक यांनी यावेळी सांगीतले, यावेळी मोठ्या प्रमाणत महिला शेतकरी उपस्थित होत्या. या नावीन्यपुर्ण उपक्रमाबाबत महिला शेतकऱ्यानी कृषी विभागाचे कौतुक केले.