प्रतिनिधी – दिनांक 29 एप्रिल रोजी हनुमंत केशव सातव यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी सातव कुटुंबाच्या वतीने सामाजिक विविध उपक्रम करून साजरा करण्यात आला. या उपक्रमात कथाकथनकार, प्रबोधनकार प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी प्रबोधन केले. सातव परिवारातर्फे येणाऱ्या सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार यांना फळांची रोपे आणि समाज सुधारकांची पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी झाडे लावू झाडे जगवू हा संदेश देण्यात आला. रोपांचे वाटप प्राध्यापक रवींद्र कोकरे, सदाशिव बापूजी सातव, पोपटराव ढवाण, कल्याण पाचांगणे, नितीन सातव, प्रकाश सातव, यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यस्मरण दिनी प्रमुख उपस्थिती केशव बापु जगताप पणदरे, अविनाश गोफणे, प्रदिप डुके, योगेश नालंदे, संभाजी माने, जयसिंग देशमुख, डॉ नंदकुमार यादव उपस्थित होते. जुन्या रितीरिवाजाना फाटा देऊया काळाची गरज ओळखून रोपांची देवान घेवाण करूया झाडे लावु झाडे जगवु निसर्ग वाचवुया हा संदेश प्रथम पुण्यस्मरणदिनी सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई सातव यांच्या वतीने देण्यात आला.