प्रतिनिधी – दि. 22 एप्रिल रोजी जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती सकाळी मन्मथ स्वामी मंगल भवन येथे महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तिचे पूजन करुण आणि महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकर जयंती मोहोत्सव समिति तर्फे डॉ बाबासाहेब अंबेडकर स्मारक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन तसेच महात्मा बसवेश्वर सर्कल येथील फलकाला पुष्पहार अर्पण करुण सकाळचे महत्वपूर्ण कार्यक्रम आटपुन संध्याकाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पारंपरिक वाद्य पथकाच्या जल्लोशात समस्त लिंगायत समाजाच्या मार्गदर्शनाने महात्मा बसवेश्वर जयंती मोत्सव समिति च्या सहकार्याने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध लिंगायत संघटनानी आवरजुन उपस्थित राहून, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट , वीरशैव लिंगायत युवक संघटना , वीरशैव लिंगायत रुद्र मंडळ , वीरशैव लिंगायत भजनी मंडळ , अन्नपूर्णा सोशल ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.